1965 च्या सुमारास शिक्षण, संस्कृती, राजकारण, समाजकारण, व्यवसाय, उद्योगांच्या संदर्भात पुण्याचे नाव देश-विदेश पातळीवर गाजत होते. येथील उद्योग आणि उद्योजकांकडे तंत्रज्ञानाच्याजोडीला संबंधित विषयांचे ज्ञान, कौशल्य, परिश्रम वृत्ती, समर्पित भावना व व्यावसायिक सचोटी इत्यादी सर्व होते, गरज होती ती त्याला व्यवस्थापन विषयक कार्यशैलीची जोड देण्याची.
याच गरजेपोटी, वत्यावेळी विशेषता पुणे आणि परिसरात वेगाने विकसित होणाऱ्या त्या मार्गदर्शनपर गरजेची पूर्तता जणू पुणे मॅनेजमेंट असोसिएशन म्हणजेच पीएमए च्या माध्यमातून झाली असे म्हटल्यास वावगे होणार नाही. 27मे हापीएमएचास्थापना दिवस असल्याने त्यानिमित्ताने या संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा मागोवा घेणे हे महत्त्वाचे ठरते.
पीएमएच्या 1965पासूनच्यासुरुवातीच्या काळात संस्थेचे कामकाज अनौपचारिकरीत्या बँक ऑफ महाराष्ट्र व किर्लोस्कर ग्रुप यांच्या सहकार्याने सुरू झाले. त्या उपक्रमाला इतरांची साथ आणि बळ मिळत गेले. साधारणपणे 1977 पर्यंत पीएमएचे कामकाज अनौपचारिकरीत्याच चालत होते. 1972 सालापासून इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स यांनी दिलेल्या जागेत पीएमए चे कामकाज सुरू झाले.त्यानंतर 1977 पद्मभूषण शंतनूरावजी किर्लोस्कर, बँक ऑफ महाराष्ट्र चे संस्थापकश्री सी व्ही जोग, उद्योजक डॉक्टर निळकंठराव कल्याणी,श्री चंद्रकांतजी किर्लोस्कर आणि स्वस्तिक रबरचे श्री व्ही एस वैद्य आणि इतर मान्यवरांनी एकत्र येऊन, विचारविनिमय करून प्रयत्नपुर्वक पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचीऔपचारिक स्थापना करायचे ठरले. त्याप्रमाणे27 मे1977मॅनेजमेंट असोसिएशनची सार्वजनिक न्यास म्हणून चारिटी कमिशनर कडे रीतसर नोंदणी झाली व या कामाला वेगळी गती प्राप्त झाली.
आपल्या स्थापना काळापासूनच पीएमएद्वारापुणे आणि परिसरातील विविध उद्योजकांच्या उद्योग-व्यवसायाला दर्जात्मक उत्तमतेची साथ देऊन त्याद्वारा व्यवसाय व्यवस्थापनाशी व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तींना मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे, त्या अनुषंगाने विविध व्यावसायिक विषयांवर अभ्यासपूर्ण संशोधन करणे, विविध विषयांवरील प्रशिक्षणाचे आयोजन करणे, चर्चासत्रांचे नियोजन करणे, व्यवसाय विषयक माहिती व यशोगाथा यांचे तसेच अनुभवांचे आदान प्रदान करणे, इत्यादी कार्यक्रम सातत्याने राबवण्यात आले. उद्योजकांच्सातत्याने राबविण्यात आले.
उद्योग व्यवसायाला व्यवस्थापनाची पूरक जोड देण्याच्या दृष्टीनेपीएमएतर्फे संस्थेच्या सदस्यांसह इतर सर्वांनाही-उद्योग आणि उद्योजक आणि संबंधित घटकांसाठी प्रगतउद्योग व व्यवसायशैली, विकसित तंत्रज्ञान, दर्जात्मक विकास, प्रगत कार्यपद्धती, वित्तीय व करपद्धती, व्यापार व विपणन, औद्योगिक सुरक्षितता, पर्यावरण विकास, मानव संसाधन विकास, कर्मचारी कौशल्य विकास इत्यादी विषयांवर आधारित प्रशिक्षणसत्रांचेआयोजन वेळोवेळी केले. त्याचा फायदा सर्वांनाच - सभासदांना आणि इतरांनाही झाला आहे. या प्रशिक्षणसत्रांच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील विषयतज्ञांचे ज्ञान आणि अनुभवाचा फायदा सदस्य उद्योगात पर्यंत पोहोचायची काम पीएमएने अत्यंत उत्कृष्टरित्या केलेले आहे.
पीएमएच्यास्थापन काळापासूनच संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे श्री चंद्रकांतजी किर्लोस्कर,श्री सी व्ही जोग, डॉक्टर एमव्हीपटवर्धन, डॉक्टरपीएम पारखे,श्रीजीएस तळावलीकर, कंपनी सेक्रेटरी श्रीवीरेन सेठ,डॉक्टर दिलीप बोरावके, डॉक्टर मंगेश कराड, डॉक्टर गणेश नटराजन यांच्यासारख्या धुरिणांनी सांभाळली असून हीच धुरा पुढे समर्थपणे व प्रभावी स्वरूपात अजूनही सांभाळली जात आहे.
सध्या राज्याच्या उद्योग विभागाचे निवृत्त सहसंचालक बाळ पाटील अध्यक्ष, प्रदीप तुपे, संजय गांधी, प्रशांत पुंडउपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे याशिवाय मार्गदर्शन करण्यासाठी एक व्यापक सल्लागार समिती असून त्यात तंत्रज्ञान, व्यवसाय, व्यवस्थापन विषयातील तज्ञ मंडळी व विशेष मार्गदर्शक (मेंटोर)यांच्या माध्यमातून सदस्यांना त्यांच्या गरजांनुसार मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे.
सदस्यांना प्रसंगानुरूप व विशेष मार्गदर्शन साठी पुणे मॅनेजमेंट असोसिएशन (पीएमए)तर्फे महाट्रेनर्स महाइंजिनियर्स असे विशेष उपक्रम यशस्वीरीत्या राबविले जात आहे. या उपक्रमाद्वारे सदस्य उद्योजकांना त्यांच्या गरजांनुसार विविध विषयांवरील प्रशिक्षणची विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली असून त्याशिवाय प्रगत अभियांत्रिकी- तंत्रज्ञानाची प्रगत व अद्ययावतमाहिती विविध उपक्रमांद्वारे उपलब्ध केली जाते. त्याचा फायदा सभासद आणि इतर सर्वांनाच होत असतो.
वरील उपक्रम आणि शिवाय व्यवस्थापन विषयात ज्ञान संकलन करून त्याद्वारे सदस्य उद्योगांना बदलत्या परिस्थितीत व गरजांनुसार प्रगत व अद्यावत स्वरुपात प्रशिक्षण मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या उद्देशाने पीएमए विशेष पुढाकार घेऊन विशेष प्राविण्य केंद्र(सेंटर ऑफ एक्सलन्स) ही संकल्पना यशस्वीपणे साकारली आहे.
या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये सद्यस्थितीत नव्हे तर व्यवसाय उद्योजकांच्या आगामी काळातील व्यवसाय व्यवस्थापन, व्यवस्थापन वृद्धि विषयक गरजा लक्षात घेऊन विशेषत्वाने करियर नियोजन मार्गदर्शन, तंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पना, नागरी सेवा विषयक प्रश्न, विक्री व्यवस्थापन, कौशल्य विकास, गुणवत्ता व्यवस्थापन, मानव संसाधन विकास, उद्योजकता व्यवस्थापन, शैक्षणिक विकास, माहिती तंत्रज्ञान व वित्तीय व्यवस्थापन यासारख्या विषयांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे अशी 14 सेंटर ऑफ एक्सलन्स कार्यरत आहेत आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 90 पेक्षा अधिक विशेषज्ञ उत्स्फूर्तपणे जॉयऑफ गिविंग बॅक टू सोसायटीया प्रवृत्तीने पूर्णतः voluntary तरी पद्धतीनेसहभागी झाले आहेत. हे सर्व स्वयंसेवी सभासद आपलं ज्ञान आणि अनुभव याचा उपयोग गरजू विद्यार्थी, व्यवस्थापक, उद्योजक यांच्या मदतीसाठी करतात.
या विशेष उपक्रमाद्वारे सध्याच्या कठीण काळात सुद्धाव्यवस्थापन क्षेत्राच्या सर्वंकष विषयांवर सुमारे 200 पेक्षा अधिककार्यक्रमांचे आयोजन पीएमएद्वारे यशस्वीरित्या केली असून हजारो इच्छुकांनी त्याचा लाभ घेतला. आणिपीएमएची उपयुक्तता यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
उद्योग व्यवसायाची निगडित आवश्यक अशी माहिती ज्ञान आणि अनुभव एकत्रित करून आपले ध्येय धोरण आणि मार्गदर्शक तत्त्व सदस्यांसाठी उपलब्ध होण्यासाठी पीएमए चे सदस्यत्व तीन प्रकारे उपलब्ध आहे. त्यामध्ये कॉर्पोरेट सदस्यत्व, वैयक्तिक सदस्य व विद्यार्थी सदस्यत्व अशा प्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे समाजातील सर्व स्तरांना त्याचा लाभ होऊ शकतो. त्याशिवाय संस्थांसाठी विद्यार्थी- प्राध्यापक घटकांसाठी स्टुडंट्स चॅप्टरही संकल्पना सुद्धाअनेक कॉलेजांमध्ये व शैक्षणिकसंस्थांमध्येपीएमएतर्फे यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.
धन्यवाद